The demand of Shekap MLA Bhai Jayant Patil is to start paddy procurement, agricultural godown and forest industry

122

गडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा

धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी

The demand of Shekap MLA Bhai Jayant Patil is to start paddy procurement, agricultural godown and forest industry

गडचिरोली ( २९ डिसेंबर ) : गडचिरोली हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी जंगलांचे रक्षण करुन त्यावर आधारित उद्योग शासनाने सुरू करावेत. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली.आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषावरील २६० नियमान्वये चर्चेदरम्यान आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, पुर्व विदर्भात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू होत नाही. साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाच्या पैशांनी खरेदी केलेले धान्य सडून कोट्यवधींचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात धान साठवणूक गोदामांचे बांधकाम करण्याची आवश्यकता असून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावे.जंगलावर आधारित ब्रिकेटींग उद्योग सुरू करण्यासाठीही शासनाने पुढाकार घेण्याची मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here