मार्कंडादेव येथील मंदिर रेतीच्या ओवर लोड वाहतुकीमुळे जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर

177

मार्कंडादेव येथील मंदिर रेतीच्या ओवर लोड वाहतुकीमुळे जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर

मार्कंडादेव:- दि 15 जानेवारी 2025 :- विदर्भाची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मार्कंडादेव येथील मंदिर परीसर लगतच्या रस्त्याहुन मोहुर्ली या ठीकानाहुन रेती भरलेले ट्रक मार्गक्रमण करीत आहेत या ओवरलोड वाहतुकीमुळे मार्कंडादेव मंदिर जमिन दोस्त होण्याची वेळ येत आहे सविस्तर वृत्त असे की मोहुर्ली या गावातील रेती घाटाहुन रेतीची वाहतुक सुरवात केली आहे साधारणपणे 1 महिण्याचा कालखंड होत ,रामाळा,घारगांव मोहुर्ली या गावातुन ही वाहतुक जात होती पन त्यांनी यांना बंद केल्याने मार्कंडा देव हुन आपला मार्गक्रमण करण्यास सुरवात केली पन ही सदर रेती भरलेले मोठ्या टनाचे ट्रक मार्कंडादेव येथील मंदिर परीसरालगतच्या रस्त्यानी जात आहे, त्या मोठ्या गतीने कंपन तैयार होत असुन मार्कंडा देव जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर आले आहे ही वाहतुक लगेच बंद न केल्यास मार्कंडादेव मंदिर पडल्या जाईल यात तिळमात्र शंका नाही सोबतच मार्कंडा देव येथील ग्रामवासीय जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन प्रवास करीत आहे.जर जिवित हाणी होण्याची शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही या संबधाने स्थानीय नागरीकांनी चामोर्शी चे तहसील दार प्रशांत घरुडे,उपविभागीय अधिकारी अमीत रंजन यांना विनंती करुन सांगीतले की ही वाहतुक बंद करावी पन अजुन पर्यंत मार्कंडादेव येथुन जाणारी रेतीची औवरलोड वाहतुक बंद झाली नसल्याचे चित्र दिसत आहे,प्रशासन मार्कंडादेव येथील मंदीर जमीनदोस्त होण्याच्या की एखाद्या जिवितीहाणीची वाट पाहत आहे की काय असाच प्रश्न निर्माण होत आहे?

सार्वजनिक बांधकाम विभागानी ईतक्या मोठ्या टनानी भरलेला ट्रक ओवरलोड वाहतुक करण्यासाठी रस्ता निर्माण केला होता काय हा प्रश्न सुद्धा अनुऊर्तीन आहे.ही ओवरलोड रेतीची वाहतुक बंद झाली नाही तर ईसवी सन आठव्या शतकातील मंदीर जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही.याला संपूर्ण जबाबदार हा तालुका व जिला प्रशासन असेल असे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here