Take action against those who vandalized and arson the Mata Mauli site in Navargaon. A statement from Navargaon residents to the MLA Doctor Devraoji Holi.

70

Take action against those who vandalized and arson the Mata Mauli site in Navargaon. A statement from Navargaon residents to the MLA Doctor Devraoji Holi.

नवरगाव येथील माता माऊली स्थळाची तोडफोड व जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाई करा नवरगाव वासियांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

नवरगाव येथील बांधवांनी शांततेने , एकमेकांच्या श्रद्धांना ठेच न पोहोचवता सामंजस्याने निर्णय घ्यावा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे ग्रामवासीयांना आवाहन

 

धर्माच्या भावनांशी खेळणाऱ्या व धार्मिक विवाद वाढवणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार महोदयांचे प्रतिपादन

 

गडचिरोली 04 जाऩे :- gadchiroli मौजा नवरगाव तालुका चामोर्शी येथे काही दिवसापूर्वी काही समाजकंटकाने जुन्या काळापासून पूजा पद्धती करीत आलेल्या गावातील माता माऊली स्थळाची जाळपोळ व तोडफोड करून हिंदू सामजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याने त्या समाजकंटकावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवरगाव येथील नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून सर्व धर्माच्या नागरिकांनी दुसऱ्यांच्या धार्मिक भावनांचा आदर करावा, कोणाच्याही भावनेला ठेच पोचणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. तसेच ज्या लोकांनी या माता माऊलीच्या स्थळाची तोडफोड व जाळपोळ केली. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे मागील काही दिवसापूर्वी जुन्या पारंपारिक रीतीने पूजा पद्धती करीत असलेल्या माता माऊलीच्या स्थळाची काही समाजकंटकांनी तोडफोड करून वादविवाद निर्माण केला. त्यामुळे गावामध्ये धार्मिक वातावरण बिघडले. यासंदर्भात ग्रामवासीयांनी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केली. ४०-५० हून अधिक लोकांचे त्यामध्ये बयान घेण्यात आले. बयान घेवून १ महिना होत आहे मात्र अजूनपर्यंत त्या समाजकंटकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची दुष्कृत्य करण्याची प्रवृत्ती वाढतच चाललेली आहे. असेच घडत राहिल्यास गावातील धार्मिक वातावरण बिघडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आपण यात हस्तक्षेप करून त्या समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून नवरगाव वासियानी आमदार महोदयांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here