Take action against the person who cheated the tribal youth of Etapalli taluk in the name of giving truck District President Mahendra Bramhanwade

76

ट्रक देण्याच्या नावाखाली एटापल्ली तालुक्यातील आदिवासी युवकांच्या फसवणूकीचा प्रश्न अजूनही प्रलंबित.

Take action against the person who cheated the tribal youth of Etapalli taluk in the name of giving truck District President Mahendra Bramhanwade

गडचिरोली :- 2019 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लायन्ड मेटल कपंनी च्या वतीने एटापल्ली तालुक्यातील बरेच युवकांना रोजगार देण्याच्या नावावर ट्रक च्या चाव्या दिल्या व ट्रक देण्याबरोबर त्या ट्रक सुरजागड च्या खदाणीत सुरु करून देण्याचेही सांगितले व गोरगरीब युवकांकडून काही प्रमानात अनामत रक्कम ही घेण्यात आली. मात्र अद्यापही त्या ट्रक युवकांना मिळाले नसल्याने अन्याय ग्रस्त युवकांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या कडे धाव घेतली व जिल्हा काँग्रेस द्वारा आयोजित पैदल मोर्चात सहभागी होऊन मोर्चाला पाठिंबा दिला.

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, जिल्ह्यातील युवकांवर झालेल्या अन्यायाची कल्पना दिली. यावर उपमुख्यमंत्री महोदयांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करत तात्काळ कंपनी व इतर दोषींवर कलम 420 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मात्र अद्यापही या बाबतीत प्रशासनाने काही कार्यवाही केल्याचे दिसत नाही? या बाबतीत लवकर निर्णय न घेतल्यास व जिल्ह्यातील युवकांना न्याय न मिळवून दिल्यास जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासन आणि लायन्ड मेटल कम्पनी विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here