Strict action will be taken against those who do not stay at the headquarters, said the CEO of ZP

85

मुख्यालयी न राहणाऱ्यावर कडक कारवाई होणार, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी

Strict action will be taken against those who do not stay at the headquarters, said the CEO of ZP

Gadchiroli गडचिरोली:-दि.01/09/2023 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी २९ ऑगस्ट रोजी विभाग प्रमुखांच्या नावाने पत्र काढले आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय सक्तीचे करावे, जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाही. त्यांच्यावर कारवाई करावी असे पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

 

ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय सर्व विभागांचे वर्ग १ ते वर्ग-४ चे जि.प. कर्मचारी मुख्यालयी हजर राहणे आवश्यक आहे. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी मुख्यालयी वास्तव्य राहतात की नाही, याबाबत वेळोवेळी पडताळणी करावी.

तसेच कार्यालय प्रमुख, गटविकास अधिकारी, खाते प्रमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटी दरम्यान त्यांची उपस्थिती अनिवार्य राहील. जे कर्मचारी शासकीय निवासस्थानात वास्तव्याने राहतात तसे संबंधित कार्यालय प्रमुखांनी प्रमाणित करावे. जे कर्मचारी निवासस्थानात राहत नसतील त्यांच्या बाबतीत भाडेकरार केल्याचे दस्तऐवज मागवून घ्यावेत. कार्यालय प्रमुखांनी नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी. अन्यथा कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here