गडचिरोली जिल्ह्यासाठी शेतकर्यांना बियाणे सवलतीच्या दराने उपलब्ध

20

गडचिरोली जिल्ह्यासाठी शेतकर्यांना बियाणे सवलतीच्या दराने उपलब्ध

गडचिरोली, (s bharat news network Gadchiroli) दि.07: अन्न् आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे. याकरिता चालू वर्षी हरभरा, जवस, करडई, भूईमुग व मोहरी, तीळ या पिकांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतक-याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतक-याला आवश्यक असणा-या बियाण्याचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्याची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. २८ सप्टेंबर २०२४ ते दिनांक १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here