पोलीस अधीक्षक कार्यालय व गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिन
पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे सह पालकमंत्री मा. अँड अशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली चित्तथरारक प्रात्यक्षिके
माओवाद प्रभावित अतिदुर्गम भागातील नवनिर्मित पोमकें पेनगुंडा येथे 150-200 नागरिकांच्या उपस्थितीत प्रथत:च पार पडला प्रजासत्ताक दिन सोहळा
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पोस्टे आष्टी अंतर्गत मौजा कोनसरी येथे नवीन बीट निर्मिती
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे प्रमुख उपस्थितीत 76 व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी माओवाद विरोधी अभियानात आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या शौर्याचे प्रदर्शन करणाया 05 पोलीस नाईक अंमलदार यांना पोलीस हवालदार व 01 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उपनिरीक्षक या पदावर अशा एकुण 06 जवानांना वेगवर्धीत पदोन्नती देण्यात आली असून त्यांचा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हयाचे सह पालकमंत्री मा. अॅड. अशिष जयस्वाल यांचे हस्ते राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, या कार्यक्रमप्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाकडुन पथसंचलन तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील संपूर्ण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्या./पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला.
मागील महिन्यात दि. 11 डिसेंबर 2024 रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र पेनगुंडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अतिदुर्गम अशा माओवाद प्रभावित पेनगुंडा येथे पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. पोमके हद्दीतील सुमारे 150-200 नागरिक माओवादयांच्या खोटया क्रांतीला व पोकळ धमक्यांना न जुमानता या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पोमकें स्तरावर क्रिकेट आणि व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच पोस्टे आष्टी अंतर्गत मौजा कोनसरी व आजुबाजुच्या परिसरातील गावातील लोकसंख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रसंगी त्वरीत प्रतिसाद देता यावा व परिसरात कोणतीही अनूचित घटना घडू नये तसेच परिसरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मौजा कोनसरी बाजारवाडी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, पोस्टे आष्टी प्रभारी अधिकारी पो. नि. विशाल काळे व पोस्टे आष्टी चे अधिकारी व अंमलदार, मौजा कोनसरी गावचे सरपंच श्री. श्रीकांत पावडे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच आजुबाजुच्या परिसारातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मौजा कोनसरी येथे राष्ट्रध्वज फडकवून कोनसरी बीट कार्यन्वयीत करण्यात आले.