रंगभूमीला जिवंत ठेवण्याचे काम झाडीपट्टीतील कलावंतांचे भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन
Pramod Pipre, District General Minister of BJP asserts that the work of the artistes in the forest is to keep the theater alive.
दर्शनी माल येथे “लाखात एक, लाडाची लेक” नाट्य प्रयोग
गडचिरोली:- दि 28/12 :- gadchiroli -dharshani mal village -गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यात उत्कृष्ट अभिनय करणारे कलावंत निर्माण होत आहेत आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे नाटयकलेच्या माध्यमातून कलाकार आपल्या जिल्ह्याची ओळख बाहेर निर्माण करीत आहेत त्यांच्या कला व अभिनयामुळे आज अनेक नाटकांचे निर्माण होत असून या भागातील अनेक गावांमध्ये प्रसिद्ध नाटके गाजत आहेत. आपल्या आदिवासी दुर्गम भागात युवकांमध्ये उपजतच कला गुण भरलेले असून त्यांच्या अभिनय व कलेची दखल घेण्याची खरी गरज असून त्यांच्या उपजत कलागुणांमुळेच आज खरी रंगभूमी जिवंत असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले. काल दिनांक 27 डिसेंबर रोजी गडचिरोली तालुक्यातील दर्शनी माल येथे आयोजित लाखात एक लाडाची लेक या नाटक प्रयोगाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जय बजरंग बली नाट्य कला मंडळ दर्शनी माल यांच्या सौजन्याने मौजा दर्शनी माल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोरील आवारात झाडीपट्टी मराठी रंगभूमी वडसा र्निर्मित शिल्पा पाटील लिखित संगीत ‘लाखात एक लाडाची लेक”या नाट्यप्रयोगाचे आयोजन काल दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे भाजपचे गडचिरोली तालुकाध्यक्ष रामरतन गोहने , गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर ,तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, जिल्हा सचिव अविनाश महाजन,तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भांडेकर, तालुका सचिव मोरेश्वर भांडेकर, सुधाकर जी वैरागडे उमाजी पिपरे, प्रकाश खोब्रागडे, दर्शनी माल ग्रामपंचायत च्या सरपंच जयकला दुधबळे, पोलीस पाटील धोंडूजी उडान, उपसरपंच कालिदास सातपुते , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल उडान ग्रामपंचायत सदस्य विनोद सातपुते भांडेकर, मुरलीधर उसेंडी, जयदेव कोठारे ,राकेश धोटे, संजय बांगरे,ग्रा.पं सदस्या ज्योती उडान ,पौर्णिमा वैरागडे यशवदा बोबाटे ,रत्नाकर गोटमुकुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.नाट्यप्रयोगाचे उद्घाटन प्रमोदजी पिपरे ,बाबुरावजी कोहळे, रमेशजी भूरसे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती मातेच्या विधिवत पूजनाने व फित कापून करण्यात आले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर नाट्यप्रयोग सुरू करण्यात आला नाटक पाहण्यासाठी दर्शनी माल परिसरातील गावामधील नागरिक ,महिला व युवकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती