जनमानसाच्या जीवनाचे भाजपा नेत्यांना काही घेणे देणे नसते प्रियंका गांधी यांचे वडसा(गडचिरोली) येथे प्रतिपादन
कॉग्रेस सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाचा विचार करणारा पक्ष,
जातीये तेढ निर्माण करुन सामाजीक सलोखा धोक्यात आनणाऱ्याना खुर्चीवरुन खाली खेचा
प्रियंका गांधी ह्या कॉग्रेस चे मनोहर पोर्रेटी,व रामदास मसराम यांच्या प्रचारासाठी वडसा येथे दाखल झाल्या होत्या
गडचिरोली :- दि 17 :- जिल्ह्यातील वडसा येथे काँग्रेस महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेला प्रमुख वक्त्या म्हणून काँग्रेस नेत्या श्रीमती प्रियांकाजी गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी काँग्रेस प्रभारी श्री. रमेश चेन्निथला, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते व ब्रह्मपुरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, आणि आरपीआय गटाचे प्रमुख राजेंद्र गवई यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.सभेत बोलताना श्रीमती प्रियांका गांधी यांनी विदर्भातील आदिवासी आणि धान उत्पादक भागातील महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ज्या भागात त्या प्रचारासाठी जातात, तेथील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. यामुळे विदर्भाच्या आदिवासी पट्ट्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे वचन दिले आहे. त्यांनी धानाच्या खरेदीसाठी 1,000 रुपयांचा बोनस जाहीर करून दर 3,300 रुपये प्रति क्विंटलवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.सभेला काँग्रेस व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.