Organized two days national workshop at Gondwana University

149

गोंंडवाना विद्यापीठात दोन दिवस राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

Organized two days national workshop at Gondwana University

santoshbharatnews gadchiroli gomdwana university दि:२३ गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ‘विलुप्त होत असलेल्या बोली’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन दिनांक २४ व २५ जानेवारी २०२३ रोजी इंग्रजी विभाग व आदिवासी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे .या राष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख वक्ता म्हणून भाषा साहित्य व संस्कृती अभ्यास विभाग नांदेड विद्यापीठ नांदेड चे डॉ. दिलीप चव्हाण “भाषा संवर्धन व जतन” , डॉ. क्रिष्णा दिक्षित, आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व इंग्रजी भाषा”. डॉ, श्रीराम गहाणे, आदर्श महाविधालय, देसाईगंज वडसा “इंग्रजी साहित्य व बोलीभाषा संवर्धन”, श्री.रमेश कोरचा “गोंडी भाषे समोरील आवाहने” व श्री. नंदकिशोर नैताम “गोंडी भाषा व साहित्य ची भुमिका” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत वेगवेगळ्या भाषेतील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि भारतीय भाषांचे जतन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले शोध पत्रे सादर करणार आहेत. असे इंग्रजी विभागातर्फे कळवण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here