MLA Dr. Deveao hotli आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला संविधान दिन साजरा tembha टेंभा येथील ग्रामपंचायती मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाचे केले वाचन

59

MLA Dr. Deveao hotli आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला संविधान दिन साजरा tembha टेंभा येथील ग्रामपंचायती मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाचे केले वाचन

 

गडचिरोली :-दि २६/११/ आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त टेंभा येथील ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करून त्याचे महत्त्व विशद केले.

याप्रसंगी गडचिरोली भाजपा तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहने ,पंचायत समितीचे माजी सदस्य श्री शंकरजी नैताम, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे , टेंभा येथील सरपंच सौ. सुनिताताई भजभुजे, उपसरपंच रामचंद्र कस्तुरे, युवा नेते दिनेश समर्थ, ग्रामसेवक कोलतेजी चुडारामजी समर्थ माजी उपसरपंच यांचे सहस्थानी गावकरी उपस्थित होते

या संविधान दिनानिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये विद्यार्थी , गावकरी तसेच उपस्थित मान्यवरांसमोर संविधानाचे वाचन केले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here