मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला गती देण्यासाठी पुरातत्व विभागासोबत बैठक मा. खा.अशोक नेते यांनी घेतला आढावा

63

मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला गती देण्यासाठी पुरातत्व विभागासोबत बैठक मा. खा.अशोक नेते यांनी घेतला आढावा

Meeting with Department of Archeology to accelerate the work of Markandeshwar Temple Hon. Mr. Ashok Nete reviewed

मार्कंडादेव गृप ऑफ टेम्पल च्या बांधकामाच्या प्रक्रीयेची विस्तृत माहीती अधिक्षक श्री अरुन मलीक यांनी दिली

Detailed information about the construction process of Markandadev Group of Temples was given by Superintendent Shri Arun Malik.

दिं.२५ सप्टेंबर २०२४

वार्ताहर मार्कंडा देव :-

Markanda deo ta. Chamorshi dist. Gadchiroli गडचिरोली : विदर्भातील आणि संपूर्ण राज्यातील भाविकांची आस्था असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा बुधवारी मार्कंडा येथे आढावा घेण्यात आला. या कामाला गती देण्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक यांनी हे काम पुरातत्व विभागाच्या नियमावलीप्रमाणेच करावे लागत असल्याने वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर या कामाला गती देण्यासाठी कुशल कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना मा.खा.नेते यांनी केली.

मार्कंडा देवस्थानाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत मलिक यांनी कार्यपद्धती सांगितली. इतर कोणत्याही कामासाठी मनु्ष्यबळ आणि मशिनरी वाढवून ते काम लवकर करता येते, पण हे पुरातन नक्षीकाम असल्याने दगडांवर कोरीव काम करून ते तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करण्यासाठी याची खात्री करूनच करावे लागत आहे. या नक्षीकामासाठी मोजकेच कारागीर असल्याने वेळ लागत असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम थोडे उशिरा होत असले तरी चांगल्या दर्जाचे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावर नक्षीकाम करणाऱ्या कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना अशोक नेते यांनी केली.

या आढावा बैठकीपूर्वी सर्वांनी कामाची पाहणी केली. दगडांवर नक्षीकाम करण्यासाठी असलेले कारागिर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचे आहेत. त्यांच्या कामाची नेते यांनी प्रशंसा करत कामाला गती देण्यास सांगितले.यावेळी भारतीय पुरातत्व विभाग नागपूर मंडळ चे अधिक्षक असुन मलीक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here