Make special funds available for the schemes of OBC brothers in the district.

159

जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्या आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे मागणी

Make special funds available for the schemes of OBC brothers in the district.

पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा संपन्न

गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजासाठी विविध योजना राबवल्या जातात परंतु येथील ओबीसी समाजासाठी त्या योजना नसल्याने ओबीसी समाजाला त्यापासून वंचित राहावे लागत आहे . त्यामुळे जिल्हा वार्षिक योजननेमधून त्या योजना राबवून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रहाची मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या प्रसंगी केली.यावेळी सभेला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, जिल्हाधिकारी संजयकुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ओबीसी समाज बांधवांकरिता जिल्ह्यात विशेष योजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादित केले. त्याकरिता विषेश योजना राबवून त्यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून द्यावा अशी आग्रहाची विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केले याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here