Late Gopinathrao Munde’s birth anniversary celebration at Ashti.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा जयंती उत्सव आष्टी येथे साजरा.
सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ अशोक बांगर यांनी टाकला लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश.
गडचिरोली :- Gadchiroli चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जयंती उत्सव तेरा डिसेंबर मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आष्टी येथील वंजारी समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रसिद्ध शिवचरित्रकार, इतिहास संशोधक व व्याख्याते डॉ. अशोक बांगर हे उपस्थित होते. त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना गोपीनाथ मुंडे यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना कष्टाच्या जोरावर संघर्ष करीत स्वकर्तुत्वाने यशाचे शिखर गाठले व राजकारणात अनेक पदे भूषविली.या पदाचा वापर त्यांनी शेतकरी, शेतमजुर गोरगरिब पीडित, वंचित लोकांना न्याय देण्यासाठी केला. त्यांनी मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा चालवायचा असेल तर त्यांच्या संघर्षाचा बाणा अंगी रुजविणे गरजेचे आहे, यासाठी तसे संस्कार आपल्या मुलाबाळांना देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या जीवनातील संघर्षशील जीवनपट डॉ. अशोक बांगर आपल्या अमोघ वाणीतून उपस्थितासमोर समोर मांडला व मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाची सुरवात संत भगवान बाबा व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आष्टी येथील सरपंच सौ. बेबीताई बुरांडे, आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री कुंदन गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रकाश भाऊ कुकुडकर, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पंदीलवार ,श्री अमोल केंद्रे साहेब, श्री कागणे साहेब, प्रा.राज मुसणे, श्री राजू खांडरे, श्री.सानप साहेब, केदार सर, श्री अक्षय करपे, आष्टी येथील पोलिस पाटिल श्री.विनोद खांडरे उपस्थित होते. कार्यक्रमाला आष्टी तेथील वंजारी व इतर समाजबांधव मोठया संख्येत उपस्थित होते. सदर कार्यक्रम आष्टी येथील रंगंमंच परिसरात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिस पाटील विनोद खांडरे, कागणे साहेब, अशोक ठोंबरे, कृष्णा मुंडे, ,गजानन केंद्रे, योगेश केंद्रे, अरुण नागरगोजे, राजू खांडरे, प्रमोद खांडरे, चंदू खांडरे, अभी खांडरे, रीतिक पांढरमिशे, संतोष नागरगोजे व आष्टी तेथील वंजारी समाजबांधव यांनी अथक परिश्रम व मोलाचे सहकार्य केले.