बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ होणाऱ्या जन आक्रोश न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा  माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

39

बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ होणाऱ्या जन आक्रोश न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा  माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

उद्या १० डिसेंबर दुपारी२ वाजता शिवाजी महाविद्यालयातून न्याय यात्रेचे आयोजन

 

दिनांक ९ डिसेंबर गडचिरोली बांगलादेशामध्ये हिंदू समाज व अल्पसंख्यांक बांधवांवर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये लूट , हत्या व आक्रमण होत आहेत. त्यात महिलांवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत असून ह्या अमानवीय अत्याचाराच्या विरोधात व बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने गडचिरोली येथे जन आक्रोश न्याय यात्रेचे आयोजन १० डिसेंबर दुपारी २ वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात केले असून यामध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

बांगलादेशातील हिंदू समाज व अल्पसंख्यांक समुदायावर होत असलेला अत्याचार बांगलादेशाने तात्काळ थांबवावा .बांगलादेशातील इस्कॉन मंदिराचे संन्यासी स्वामी चिन्मय कृष्णदासजी यांची कारावासातून तातडीने मुक्तता करावी व बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना सन्मानाची वागणूक द्यावी याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश यात्रेचे आयोजन दिनांक १०डिसेंबर ला दुपारी २ वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावरून जिल्हाधिकार्यालयापर्यंत आयोजित केले आहे त्यात जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन आपला विरोध दर्शवावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here