बुरांडे लेआउट लांझेडा येथे जागतीक महिला दिन कार्यकम

43

बुरांडे लेआउट लांझेडा येथे जागतीक महिला दिन कार्यकम

गडचिरोली : द. १२ मार्च,

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन 8 मार्च रोजी बुरांडे लेआउट, लांझेडा वॉर्ड, गडचिरोली येथे महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विजया मने, डॉ. रेखा बाळेकरमकर, विमल होळी, मालती जंबेवार, शारदा पारधी, स्नेहा होळी, चंद्रकला बुरांडे, संगिता नवघडे, संध्या टिकले, आरती दास, स्वाती कुनघाडकर, किर्ती केळझरकर उपस्थित होते.

 

कार्यकमाची सुरूवात कांतीज्योती सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमेला मार्त्यापण व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रेखा बाळेकरमकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे व प्रा. विजया मने यांचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

 

यावेळी माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांनी कांतीज्योती सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या कार्यावर व विचारांवर प्रकाश टाकला व महिला दिनाचे महत्व पटवून दिले तथा महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यकमाला करूणा सहारे, कुसुम गंडाटे, स्वाती गंडाटे, ज्योती तुमरेटी, माया शिंपी, आशा राऊत, मंजुश्री बांबोळे, प्रिया रत्नपारखी, उंदीरवाडे, रूपाली रोहणकर, ज्योती गंडाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा बाळेकरमकर यांनी तर संचालन शारदा पारधी यांनी केले. आभार स्नेहा होळी यांनी मानले. कार्यकमाला बुरांडे लेआउट मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here