मार्कंडादेव नगरीत आज पासून हर हर महादेवाचा गजर! स्थानिक नागरीकांकरीता विशेष दर्शन रांगेची व्यवस्था द्यावी

224
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (0.7878906, 0.6206916);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

मार्कंडादेव नगरीत आज पासून हर हर महादेवाचा गजर! स्थानिक नागरीकांकरीता विशेष दर्शन रांगेची व्यवस्था द्यावी

मार्कंडादेव (ता.चामोर्शी जि.गडचिरोली) दि27 फरवरी :- विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव नगरीत वसलेल्या महर्षी मार्कंडेश्वर मंदिर असुन महाशिवरात्रीच्या दरम्यान फार मोठी यात्रा भरत असते यावर्षीही यात्रेचे आयोजन असुन ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती प्रशासन सर जिला प्रशासन च्या वतीने पुरविण्याचा मानस आहे,मार्कंडादेव येथे वैनगंगा नदीच्या तिरावर मार्कंडेश्वराचे प्राचीन हेमांडपथी मंदिर आहे. शिवाय अनेक छोटी मंदिरेही आहेत. या मंदिरांच्या दगडांवर खजुराहोप्रमाणे अप्रतिम कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दक्षिण वाहिनी असलेली वैनगंगा नदी उत्तर वाहिनी होते. दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागांसह शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलगंणा इत्यादी राज्यांमधून लाखो भाविक मार्कडेश्वर आणि शिवलिंगाची पूजा करण्यासाठी येतात. ही यात्रा पाच ते सहा दिवस भरते. २६ फेब्रुवारीपासून होणाऱ्या या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी यापूर्वीच यात्रेत भाविकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या यात्रेसाठी गडचिरोली व अहेरी आगारातर्फे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

यात्रेच्या वेळी भाविक वैनगंगा नदीत स्नान करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे ३० जवान मार्कंडादेव येथे पोहचले आहेत. हे जवान पाच बोटींद्वारे नदीपात्रात गस्त घालणार आहेत. संपूर्ण यात्रा परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर राहणार आहे

विशेष मागणी :- महाशिवरात्री हा पावन पर्व असुन स्थानिक नागरिकांनी करीता विशेष दर्शन रांगेची सोय ऊपलब्ध करुन द्यावी असे स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here