कोलकाता येथील बलात्कार पीडित महिला डॉक्टर ची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्या. डॉ.सोनलताई चेतन कोवे
S bharat news network
Gadcgiroli -गडचिरोली :- Calcutta कोलकात येथे दि १६ ऑगष्ट रोज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कोलकाता येथील के आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील बलात्कार पीडित महिला डॉक्टर सुवर्मा गोस्वामी यांच्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सोनलताई कोवे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात कॅंडल मोर्चा काढण्यात आला या वेळी इंडियन डेंटल असोसिएशन, गडचिरोली असोसीएशन ऑफ मेडिकल प्राकट्टीशनर,इंडियन मेडिकल असोसिएशन,मॅग्मो संघटना, गडचिरोली नर्सेस असोसिएशन,जंगो रायताड महिला संघटना चे पदाधिकारी होते कर्तव्यावर असतांना एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करणाऱ्या क्रुरकर्मी, निर्दयी गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी व पीडित महिला डॉक्टर सुवर्मा गोस्वामी यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी कॅंडल मार्च व श्रध्दांजली वाहिन्यात आली. या आंदोलनात शहरातील नामवंत डॉक्टर, परिचारिका, तसेच शहरातील महिला व पुरुषांनी सहभागी झाले. डॉ सोनलताई कोवे, दंत व मुखरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.डॉ.सोनल कोवे, शालीनीताई कुमरे, डॉ.प्रविण किलनाके, डॉ.सुनील मडावी, डॉ.लालाजी वट्टी, डॉ.प्रशांत चलाख, डॉ.किशोर वैध, डॉ.प्रांजली आईंचवार, डॉ.वैशाली चलाख, डॉ.दीप्ती वैध, डॉ.प्रियंका शेडमाके, डॉ.रुपाली पाटील, डॉ.हेमराज मसराम, डॉ.उमेश समर्थ, डॉ.अतुल गाठीबांधे, डॉ.खूशबू दुर्गे, डॉ.चेतन कोवे, डॉ.निकिता कुलसंगे, डॉ.अंकिता धाकडे, डॉ.मोनाली मेश्राम, प्रा.संध्या येलेकर, पुष्पलता कुमरे, लताताई मुरकुटे, मंगलाताई कोवे, पुष्पाताई कुमरे, आशाताई मेश्राम, वंदना मेश्राम, मनीषा मडावी, लता कुमरे, प्रियंका वासनिक, अपर्णा सहारे, सुनीता बनसोड, शिला मेश्राम, मीनाक्षी वासने, तनुजा आत्राम, मालती कुमरे, निमती तीरगे ,हरबाजी मोरे, वसंत राऊत, गुलाबजी मडावी, संजय चन्ने, संजय मेश्राम, जावेद खान, स्वप्नील बहिरे, धवल सूचक, विजय राऊत आदि उपस्तीत होते.