हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या 67 मोबाईलचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे हस्ते वाटप.
गडचिरोली:- तरुणपिढी मोठ¬ प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे नोंदविली जाते. सदरबाबत सायबर पोलीस स्टेशनमार्फत चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रीक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. मागील वर्षी सन 2023 मध्ये एकुण 135 मोबाईलचा शोध घेण्यात आला असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण 20,27,000/- रुपये एवढी होती. तसेच माहे जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या तीन महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या 67 मोबाईलचा शोध घेवुन आज दि. 05/10/2024 रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे बोलावुन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आले आहे. त्यांची अंदाजे किंमत एकुण 12,00,160/- रुपये आहे.यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी जनतेला आवाहन केले की, “सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारंामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. यासोबतच डिजीटल अरेस्टद्वारे व आर्टीफिशीयल इंटीलेजन्स (ॠक्ष्) च्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशिल फोटोंना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जाते, त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे. आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी व मोबाईल चोरी झाला असेल तर, तात्काळ ड़ड्ढत्द्ध.ढ़दृध्.त्द या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. श्रेणिक लोढा यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि. उल्हास भुसारी, मपोउपनि नेहा हांडे व मपोहवा/638 वर्षा बहिरवार, मपोअं/3901 किरण रोहणकर, पोअं/2431 संजिव लेंडगुरे, पोअं/2538 दिवाकर तनमलवार यांनी पार पाडली