पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार कट्टर माओवादी ठार
गडचिरोली(महाराष्ट्र) महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नुकतेच स्थापन केलेल्या पोस्टे कवंडे हद्दीत काही माओवादी दबा धरून बसले असल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे, अति. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील १२ सी ६० पथके (३०० कमांडो) आणि सीआरपीएफची एक तुकडी काल दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात मुसळधार पावसादरम्यान रवाना करण्यात आल्या होत्या.आज सकाळी सदर परिसरामध्ये पोलीस पथक घेराबंदी करून शोध मोहीम राबवत असताना, माओवाद्यांनी सी६० जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. जवळजवळ दोन तास अधूनमधून गोळीबार सुरू होता.
यानंतर पोलीस पथकाने परिसरात शोध मोहीम राबवल्यानंतर ४ जहाल माओवाद्यांचे मृतदेह, एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल(SLR), दोन .३०३ रायफल आणि एक भरमार* मिळून आले आहेत. याशिवाय, *घटनास्थळावरून वॉकी टॉकी, छावणी साहित्य, नक्षलवादी साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले आहेत. माओवाद्यांच्या शोधासाठी परिसरात शोध मोहिम सुरू आहे.