गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येक नागरीकांच्सा भल्यासाठी जयश्रीताई वेळदा – जराते यांना निवडून आणा

13

गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येक नागरीकांच्सा भल्यासाठी जयश्रीताई वेळदा – जराते यांना निवडून आणा

पदाधिकाऱ्यांचे मतदारांना आवाहन

गडचिरोली : तीनही विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील गैरआदिवासींना विधिमंडळात प्रतिनिधित्व करता येत नाही. परिणामी ओबीसी, ढिवर – भोई, भटके – विमुक्त आणि आंबेडकरी जनतेचे प्रश्न ताकदीने मांडले जात नाहीत. त्यामुळे आदिवासीसह गैरआदिवासींच्या प्रश्नांबद्दल जिव्हाळा असलेल्या उमेदवार जयश्रीताई वेळदा – जराते यांना सर्व गैर आदिवासी समाजांनी एकदा प्रचंड बहुमताने निवडून आणून भाजप – काॅंग्रेसला अद्दल घडवावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विधानसभा क्षेत्रात पिढ्यानपिढ्या पारंपारिक पद्धतीने आलटून-पालटून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार आपण निवडून देत आलेलो आहोत. आदिवासींसाठी राखीव असलेल्या या गडचिरोली मतदारसंघाला त्यामुळेच ठाम भूमिका असणारे नेतृत्व मिळू शकलेले नाही. साहजिकच त्याचा परिणाम म्हणून ओबीसी, ढिवर-भोई, भटके-विमुक्त आणि आंबेडकरी जनतेची बाजू विधिमंडळात मांडल्याच जात नसल्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे. आपण दरवेळी सत्ताधारी पक्षांच्या विरोधात भूमिका घेवून मतदान करतो. काँग्रेस आवडली नाही की भाजप आणि भाजप आवडली नाही की काँग्रेस असे दोनच पर्याय इच्छा नसताना आज पर्यंत निवडावे लागले आहेत. पण यावेळी एक संघर्षशील आणि जनतेसाठी स्वतःवर केसेस घेऊन सातत्याने कार्यरत असलेले नेतृत्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा-जराते या ठोस तिसरा पर्याय म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यांचे पती भाई रामदास जराते ठीवर समाजाचे असल्याने त्यांचा समाज कधी नव्हे तो प्रचंड ताकदीने एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.

 

जयश्रीताई या जन्माने आदिवासी असल्या तरी त्यांची मुले NT / OBC मध्ये येत असल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण, नोकरी, आरक्षण इत्यादींच्या समस्या त्यांच्यापुढे आहेतच. आणि म्हणून शिक्षण, नोकरी, आरक्षण, सामाजिक विकास याबद्दल त्या पोटतिडकीने प्रश्न मांडू शकणार आहेत. त्यासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील ओबीसी, गैर-आदिवासी, भोई-ढिवर, भटके-विमुक्त आणि आंबेडकरी जनतेने त्यांना एकदा संधी देऊन पारंपारिक काँग्रेस-भाजपला अद्दल घडवण्याची गरज आहे. तरी आपापल्या गावात याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करून जयश्रीताई वेळदा-जराते यांच्या “ऊस शेतकरी” चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून परिवर्तन करावे, असे आवाहन निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा प्रभारी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष धर्मानंद मेश्राम, शेतकरी कामगार पक्षाच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवित्र दास, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, महामार्ग बाधित आघाडी प्रभाकर गव्हारे, भटके-विमुक्त आघाडी डंबाजी भोयर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here