गडचिरोली :- दि. 27 विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात नवख्या डॉ. मिलिंद नरोटे यांना संधी दिली आहे. तर विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांचा भाजपने पत्ता कट केलेला आहे.गडचिरोली येथे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे तसेच विधानसभा निवडणूक संचालन समिती चे अशोक नेते यांच्या निवासी कार्यालयात अशोक नेते महाराष्ट्राचे स्टार प्रचारक म्हणून डॉ. मिलिंद नरोटे यांचे अभिनंदन केले. तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी डॉ. मिलिंद नरोटे यांना मिळाल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले.डॉ. मिलिंद नरोटे यांना भारतीय जनता पार्टी कडून गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर होतात गडचिरोली शहरातील
स्थानिक इंदिरा गांधी चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या हर्ष व उल्लासात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला.मागील दहा वर्षात डॉ देवराव होळी यांच्याकडून केल्या गेलेल्या विधानसभा क्षेत्रातील विकास कामाची पक्षश्रेष्ठीने कुठलेही दखल घेतली नाही त्यामुळे त्यांना उमेदवारी दिलेली नाही. असे बोलले जात आहे. येत्या काळात डॉ. देवराव होळी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहतात की काय हे तितके महत्वाचे आहे