अखेर वि.जे.एन.टी च्या ४४० घरकुलांना मंजुरी मिळाली आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

139

Moअखेर वि.जे.एन.टी च्या ४४० घरकुलांना मंजुरी मिळाली आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

Finally, 440 Gharkuls of VJNT got approval. MLA Doctor Devrao Holi’s continuous efforts were successful.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४४० घरकुलांना मंजुरी

 

गडचिरोली चामोर्शी व धानोरा तालुक्यातील सर्वाधिक घरकुलांचा समावेश

दिनांक २४ सप्टेंबर गडचिरोली तालुका प्रतिनिधी :- अनेक दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यातील बंजारा ,धिवर, भोई , केवट ,समाजातील घरकुल मंजूर व्हावे यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने प्रयत्न करीत होते. यामध्ये गडचिरोलीचे समाज कल्याण विभागाचे अधिकारी डॉक्टर सचिन मडावी यांनीही मोठे सहकार्य केले. यामध्ये अखेर यश मिळाले असून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४४० घरकुलांना मंजुरी मिळाली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्य शासनाचे आभार मानले असून केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

आता लवकरच या समाजातील गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून घराचे बांधकाम सुरू करण्यास आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here