Establishment of Grievance Redressal Cell in line with Nagpur Division Teachers Constituency Biennial Election- 2023

85

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक- 2023 च्या अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन

 

गडचिरोली,()दि.16: भारत निवडणुक आयोगाने प्रसिद्धीपत्रकान्वये पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. उक्त कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रार करणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील निवडणुक शाखेत तक्रार निवारण कक्षामध्ये भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आलेला असून उक्त भ्रमणध्वनी क्रमांक 8999059553 हा आहे. तसेच लेखी स्वरुपात तक्रार करण्याकरीता deogadchiroligrievance@gmail.com ई-मेल आयडी उपलब्ध करुन दिलेला आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here