डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
गडचिरोली,( s bharat news network)दि.22: राज्यातील डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2024-25 ही योजना अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2013 अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करावा.
प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुतर्ता करवून अंतिमरित्या सदर योजनेअंतर्गत अनुदानास पात्र होणाऱ्या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. दिनांक 15 सप्टेंबर 2024 नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.