निवडणुका यशस्वीपणे राबविल्याबद्दल डॉ. देवरावजी होळी यांनी एस डी एम व पोलीस अधीक्षकांचे केले अभिनंदन

28

निवडणुका यशस्वीपणे राबविल्याबद्दल डॉ. देवरावजी होळी यांनी एस डी एम व पोलीस अधीक्षकांचे केले अभिनंदन.

पोलीस अधीक्षक निलोत्पल व उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन.

दिनांक २ डिसेंबर गडचिरोली

आदिवासीं अतिदुर्गम व नक्षलग्रस्त ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. याकरिता विशेष परिश्रम घेणारे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा गडचिरोली चे उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांची माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी भेट घेतली. निवडणुका यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

निवडणुकीच्या या कार्यकाळात या कोणतीही अनुचित घटना न घडता अत्यंत शांततामय परिस्थितीमध्ये निवडणुका पार पाडण्यात जिल्हयातील अधिकाऱ्यांना यश आले. यासाठी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here