अवैद्य दारु तस्करी विरोधात पोस्टे देसाईगंज पोलीसांनी केले दारु विक्रेत्यावर कारवाई
Gadchiroli-wadsa-desaiganj गडचिरोली-वडसा (देसांईगंज)दिनांक १३/०४/२०२३ रोजी दुपारी चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथुन कडे जुनी वडसा रोड मार्गे आंबेडकर वार्ड येथे एक फिक्कट गोल्डन रंगाची मारुती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारुची वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे क्रॉसिंग ते जुनी वडसाकडे जाणा-या रोड दरम्यान तात्पुरती नाकाबंदीचे प्रयोजन करुन पाळत ठेवली असता एक फिक्कट गोल्डन रंगाची चारचाकी वाहन समोरुन संशयास्पद येतांना दिसल्याने सदर वाहन जवळ येताच चालकास हात दाखवुन थांबण्याचा ईशारा केले असता वाहन चालकाने त्यांच्या ताब्यातील गाडी रोडकडेला थांबविली.
सदर वाहन क्र. एम. एच. ३१ सि. पी. ८१७६ या गाडीच्या मागील डिक्कीमध्ये खालील वर्णानाचा व किंमतीचा माल मिळुन आला असुन वाहन चालकास व गाडीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या ईसमांना प्रथम गाडीचे खाली उतरवुन पंचसमक्ष प्रोव्ही बाबत गाडीची पाहणी केली असता आरोपी कडुन मिळालेला माल १६ खर्चाच्या बॉक्स मध्ये देशी दारु संत्री कंपनीच्या ९० मि. ली. मापाच्या प्रत्येक बॉक्समध्ये १०० निपा असा एकुण १६०० निपा, किंमत ८० रु. प्रत्येकी १,२८,०००/- रुपयांचा माल मिळुन आला. व एक जुनी मारोती सुझुकी कंपनीची गोल्डन रंगाची चारचाकी वाहन किंमत अंदाजे २,५०,०००/- रुपये असा एकुण ३, ७८, ०००/- रुपयाचा माल ताब्यात घेण्यात आला.
पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपी नामे १) रॉबिनसिंग महेंद्रसिंग बावरी, वय २० वर्ष २) आरोपी नामे मिथुन भाऊराव नागापुर, वय २४ वर्ष, हे दोघे रा. आंबेडकर वार्ड देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन यांचे विरोधात अपराध क्र. ००९७/२०२३ दिनांक १३/०४/२०२३ कलम, ६५ (अ), ८३, ९८ (२) मदाका, सहकलम १३० ( १ ) / १७७, १४६ / १९६ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हांच्या तपास पोस्टे देसाईगंज येथील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक श्री. रासकर, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार, कुमोटी, ढोके यांनी केकेली आहे.