गडचिरोली,Gadchiroli ता. ३० : bhamragad taluka भामरागड तालुक्यातील koti madat कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत तुमरकोठी येथील घिसू मट्टामी नामक ५० वर्षीय गावपाटलाची नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री गोळ्या झाडून हत्या केली.घरी झोपेत असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी घिसू मट्टामी ghisu matthami यास उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर त्याची दोन गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह रस्त्यावर ठेवला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतदेहावर नक्षल्यांनी ठेवलेल्या चिठ्ठीत घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचे म्हटले आहे. मात्र, मृतक घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता, तर तो नक्षल्यांच्या ग्रामरक्षक दलाचा सदस्य असण्याची शक्यता आहे, असे SP gadchiroli Nilotpal पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले.त्यामुळे ही हत्या naxal नक्षल्यांच्या अंतर्गत वादातून झाली असण्याची शक्यता आहे. दीड महिन्यापूर्वी ८ नोव्हेंबरला एटापल्ली तालुक्यातील झुरी गावचा रहिवासी दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी नामक आपल्या सहकाऱ्याची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्याचप्रकारे घिसू मट्टामी याचीही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे.
Latest article
मार्कंडादेव येथील रेवनाथ लक्ष्मण कोडापे गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता
मार्कंडादेव :- चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील रहिवासी रेवनाथ लक्ष्मण कोडापे ही व्यक्ती दिनांक 16/04/2025 पासून अचानक घरातुन बाहेर निघुन गेला त्यांचे मुळ गांव...
खंडणी बहादुराचा शिक्षकाला लैंगिक गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न
खंडणीखोराची शिक्षकाला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
Khandani Bahadur attempts to implicate teacher in sexual crime
गडचिरोली, ता. ८ : कमलापुर येथील श्रीगुरुदेव प्राथमिक तथा माध्यमिक...
अवैध दारुची तस्तकरी करणाऱ्यास चढला बंदुकीचा जोर
दारू तस्कराने मारहाण करून पिस्तूलने धमकावले
गडचिरोली, ता. ९ : दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत दारू तस्करीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. व्यवहारातील पैशावरून एका दारूतस्कराने रानात नेऊन...