
भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी घेतले श्री हनुमानाचे दर्शन

Gadchiroli complex- गडचिरोली :- आज दिनांक 6 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाचे निमित्त साधून भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांनी गडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स टी पॉईंट चौकातील हनुमान मंदिर व तेली मौला हनुमान वार्डातील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पूजा केली. यावेळी गडचिरोली विधानसभेचे आमदार गडचिरोली डॉक्टर देवराव होळी यांनीही उपस्थिती दर्शवून श्री हनुमानाचे दर्शन घेतले व पूजा केली. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे शहर महामंत्री केशव निंबोड शहर उपाध्यक्ष विवेक बैस महिला मोर्चा ओबीसी आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना निंबोड शहर सचिव नीताताई बैस शहर महामंत्री वैष्णवी नैताम, विलास नैताम व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.