लाडक्या बहिणींचा मेळावा चित्तरंजनपुर व आष्टी येथे ३० सप्टेंबरला आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे लाडक्या बहिणींना उपस्थित राहण्याचे आवाहन
Beloved Sisters’ Gathering at Chittaranjanpur and Ashti on September 30 MLA Doctor Devrao Holi’s appeal to the beloved sisters to attend
चित्तरंजनपुर येथे सकाळी ११ वाजता तर आष्टी येथे येथे दुपारी २ वाजता होणार मेळावा
महिला प्रभाग संघाच्या सभागृहांचे भूमिपूजनही होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नोंदणी केली जाणार
दिनांक २९ सप्टेंबर गडचिरोली
राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपुर व आष्टी येथे ३० सप्टेंबरला आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले आहे
हा मेळावा चित्तरंजनपूर येथे काली माता मंदिरासमोरील परिसरात सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी २ वाजता आष्टी येथील शासकीय विश्रामगृह परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निधी उपलब्ध करून दिलेल्या महिला प्रभाग संघाच्या सभागृहांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.