Allocation and distribution of wheat, rice and sugar to eligible beneficiaries of Antyodaya food scheme and priority families

81

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप

Allocation and distribution of wheat, rice and sugar to eligible beneficiaries of Antyodaya food scheme and priority families

गडचिरोली,(Gadchiroli)दि.04: गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रु.3/- प्रतिकिलो तांदूळ, रु.2/- प्रतिकिलो गहू व रु.1/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने वितरीत करण्यात येणारे अनुज्ञेय असलेले अन्नधान्य दिनांक 01.01.2023 ते दिनांक 31.12.2023 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरिता पात्र लाभार्थ्यांना “मोफत” वितरीत करावयाचे आहे. नियतनाचा महिना कोणताही असला तरीही सदर अन्नधान्य दि.01.01.2023 पासून मोफत वितरीत करण्याबाबतचे शासन निर्देश प्राप्त असून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 30 किलो तांदुळ, 5 किलो गहू, साखर 20 रुपये किलोप्रमाणे 1 किलो. प्राधान्य कुटुंब लाभार्थीना प्रती व्यक्ती 4 किलो तांदुळ, 1 किलो गहू असेल.तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येत की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे 01 जानेवारी, 2023 पासून महिन्यातील नियमित देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची “मोफत” उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावतीवर रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी. व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची “मोफत” उचल करावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here