लोहार समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ होणे आवश्यक,माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
All must unite for the development of the blacksmith community, asserted former mayor Yogitatai Pipre
गडचिरोली येथे लोहार समाजाचा जिल्हा मेळावा व गुणवंताचा सत्कार
Gadchiroli गडचिरोली :- दि. 7 एप्रिल गाडी लोहार समाज हा आजही मागासलेला असून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात पसरलेला आहे या समाजाचा अजूनही पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही त्यामुळे समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण गाडी लोहार समाज बांधवांनी एकत्र येऊन परिश्रम घेऊन लढा देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. गडचिरोली येथील चंद्रपूर मार्गावरील वासेकर सभागृहात आयोजित गाडीलोहार समाजाच्या जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या आज दि. 7 एप्रिल रोजी विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून लोहार समाजाचा जिल्हा मेळावा , गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार तसेच वधु-वर परिचय मेळावा पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे अध्यक्ष प्राचार्य चरणदास बावणे होते. विशेष अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी, दत्तसाई अमृत मंदिर आकापूर चे महाराज ऋषीदेवजी येरमे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गाडी लोहार महासंघ नागपूरचे सल्लागार मांडवकर, कार्यक्रमाचे स्वागता अध्यक्ष तथा गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, समाजाचे युवा नेतृत्व संजय मांडवगडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष संजय हजारे उपस्थित होते. या कार्यक्रमात गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ गडचिरोली च्या वतीने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी व उपस्थित प्रमुख मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मेळाव्याला समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.