
अनखोड्यात वस्तीच्या मध्यभागी तणसाच्या ढीगाऱ्याला लागली आग..

गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली
A pile of weeds caught fire in the middle of the settlement in Ankhoda
Ankhoda village-Chamorshi- Gadchiroli चामोर्शी:- तालुक्यातील अनखोडा येथे तणसीच्या ढीगाला आग लागली. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. ही घटना दिनांक 2 एप्रिल रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
अनखोडा येथील सुरेश राऊत यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत तणसीचा ढीग होता. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तणसीच्या ढीगाऱ्याला आग लागली. भर वस्तीच्या ठिकाणी ही आग लागल्याने ही आग इतरत्र पसरणार तर नाही ना याची भीती होती. कारण याला लागूनच अनेक घरे असल्याने जीवित व वित्तहानी होण्याची जास्त शक्यता होती. आग लागल्याचे कळताच अंनखोडा येथील पोलिस पाटील, आष्टी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आपदा मित्र, उपसरपंच व गावातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी पोहोचली व ही आग आटोक्यात आली. आणी गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला