Breaking गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक 12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

125

गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक 12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त

S bharat news network

गडचिरोली (Gadchiroli maharashtra) छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये Dy SP Ops च्या नेतृत्वाखाली सात C-60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.

 

 

त्यावेळी सदर परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 06 तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मृत माओवाद्यांपैकी एक ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम @ विशाल आत्राम,असल्याची माहिती मिळाली माओवाद्यांची पुढील ओळख आणि परिसरात शोध सुरू आहे.

C-60 चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले आहेत . ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

माननीय श्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री गडचिरोली यांनी वरील यशस्वी मोठ्या अभियानासाठी C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here