गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची चौकशी करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचेकडे मागणी

129

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची चौकशी करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचेकडे मागणी

 

बांधकाम निकृष्ट होत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त

मुंबई मंत्रालयात भेटून मंत्र्यांना दिले चौकशी करणेबाबतचे पत्र

दिनांक २ नोव्हेंबर २०२२ गडचिरोली

गडचिरोली(Gadchiroli)जिल्हा प्रेक्षागार मैदान गडचिरोली येथे ४४ कोटी रुपयांचे जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात येत असून बांधकाम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे असल्याने या बांधकामाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांची मुंबई मंत्रालयात देऊन केली

राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, वित्तमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या हिताचा निर्णय घेत जिल्हा क्रीडा संकुलाकरिता निधी उपलब्ध करून दिला. परंतु सदर बांधकामास ५ वर्षाचा कालावधी होऊन देखील काम पूर्णत्वास आलेले नाही. ही विचार करण्यायोग्य बाब आहे.

सदर बांधकामामध्ये कंपनी कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून सदर कामाला निधी उपलब्ध होऊन देखील अतिशय संथ गतीने बांधकाम करण्यात येत आहे. याबाबत वारंवार संबंधितांना सूचना करूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. करिता सदर बांधकामाची तातडीने चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या वर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here