पी एम किसान सम्मान निधी योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल,मा. खासदार अशोकजी नेते

105

पी एम किसान सम्मान निधी योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल,मा. खासदार अशोकजी नेते

पि एम किसान सन्मान संमेलनाच्या उद्घाटकप्रसंगी मा.खा.श्री.अशोकजी नेते

कृषि विज्ञान केंद्र,सोनापुर गडचिरोली येथे आयोजीत कार्यक्रम

दिं.१७ ऑक्टोंबर २०२२

 

गडचिरोली(Gadchiroli):-मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी या उद्घाटक कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना शेतकरी हादेशाचा पोशिंदा असून कृषि क्षेत्र हा देशाच्या अर्थकारणाचा अविभाज्य घटक आहे व त्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्वांगीन विकासाकरिता केंद्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून पी एम किसान सम्मान निधी योजना शेतकऱ्यांना भविष्यात नक्कीच लाभदायक ठरेल. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपला विकास साधावा. तसेच देशाचे विश्व गौरव पंतप्रधान, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते मा.नरेंद्र मोदी जी यांनी भारत सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मार्फत पि.एम किसान सन्मान निधी चा १२ व्या हप्त्याचे प्रकाशन केले जात आहे

असे प्रतिपादन या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.

 

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे पीएम किसान सन्मान सम्मेलन कार्यक्रम निमीत्य मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारत सरकार यांचे आभासी पध्दतीने किसान सम्मान सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आले.

 

सदर कार्यक्रमास उद्घाटक मा.खा. श्री.अशोकजी नेते, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, सदर कार्यक्रमास श्री.संदिप एस.कहाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, मा. श्री. गणेश बादाळे, प्रतिनिधी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय तथा जिल्हा मृद परिक्षण, गडचिरोली, दिशा सदस्य, चंद्रपूर तसेच कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली कर्मचारी उपस्थित होते व मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतकरी महिला उपस्थित होते.

 

मा.पंतप्रधान श्री.नरेद्रजी मोदी यांनी ,ऑनलाईनव्दारे पी.एम.किसान अंतर्गत १२ व्या हप्त्याचे वितरण, दोन दिवसीय एग्री स्टार्ट अप काॅन्क्लेव्हचे उद्घाटन ३६०० जिल्हा पीएमोएसके (प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र) आऊटलेटचे उद्घाटन, भारत युरिया पिषव्यांचा शुभारंभ, वन नेषन वन फर्टीलायझर आणि आंतरराष्ट्रीय खत ई-मासिक ‘‘इंडियन एज’’ लाॅंच डिजिटल लाॅंच यामुळे खताचा काळा बाजार बंद होईल त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन आभासी पध्दतीने करण्यात आले.

 

श्री.संदिप एस. कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी कार्यक्रमाची प्रास्तावना केली. त्याचप्रमाणे वन नेषन वन फर्टीलाझर, एग्री स्टार्ट अप आणि प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र विषयक माहीती दिली.

 

सदर कार्यक्रमाची सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निलीमा पाटील यांनी केले.

 

यावेळी शिवार फेरी दरम्यान विविध धान वाणाचे प्रात्यक्षिके, कुक्कुटपालन,देषी गायी प्रकल्प, शेळी पालन, फळे व भाजीपाला, विविध सिंचन पध्दती, कृषि यंत्र व अवजारे, नाडेप, गांडूळखत प्रकल्प, अझोला प्रात्यक्षिक प्रकल्पाला भेट देऊन तसेच तंत्रज्ञान जाणून घेतले.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डाॅ. विक्रम एस. कदम, विषय विषेशज्ञ (पषुसंवर्धन व दुग्धषास्त्र), निलीमा पाटील, विशय विषेशज्ञ (गृह विज्ञान), श्री. पी.ए. बोथीकर, विशय विषेशज्ञ (पिक संरक्षण), श्री. ज्ञानेष्वर व्ही. ताथोड, विशय विषेशज्ञ (कृशि अभियांत्रिकी), श्री. नरेष पी. बुध्देवार, विशय विषेशज्ञ (कृशि हवामान षास्त्र), श्री. एस.के. लाकडे, विशय विषेशज्ञ (उद्यानविद्या), कु. सुनिता बी. थोटे, प्रक्षेत्र व्यवस्थापक, श्री. मोहीतकुमार गणविर, हवामान निरीक्षक, श्री. हितेष पी. राठोड, श्री. षषिकांत सलामे, श्री. अंकुष ठाकरे, श्री. प्रविण नामुर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here