कचरा व्यवस्थापनासाठी 2 चारचाकी घंटागाड्या दाखल;आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते झालं उद्धाटन

149

कचरा व्यवस्थापनासाठी 2 चारचाकी घंटागाड्या दाखल आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते झालं उद्घाटन

अहेरी:-(Gadchiroli) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रत्येक शहर स्वच्छ करण्यावर शासनाचा भर आहे.त्याअनुषंगाने

आलापल्ली ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या अनुषंगाने 2 घंटा गाड्या खरेदी केली.या घंटा गाड्यांचा उदघाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार,पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी,पेसा सचिव प्रीती इष्टाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार,सोमेश्वर रामटेके,मनोज बोल्लूवार,संतोष अर्का,अनुसया सप्पीळवार,माया कोरेत,पुष्पा अलोने,भाग्यश्री बेझलवार, सुगंधा मडावी,सुमनबाई खोब्रागडे,तसेच मुश्ताक शेख,विशेष भटपल्लीवार, कैलास कोरेत,सुधाकर पेद्दीवार आदी उपस्थित होते.

सुका व ओला कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे यावर प्रभावी उपाययोजनांसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केले आहे.

ग्रामपंचायत अंतर्गत प्रभागातील ओला व सुका कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाने पुढाकार घेतला असून अबंध निधी आणि पेसा निधीतून 2 घंटा गाड्या खरेदी केले आहे.या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here