अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम

112

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम

 

गडचिरोली,दि.09: मा.सचिव,राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ग्रापंनि-2020/ प्र.क्र.04/का-08, दिनांक 07/09/2022 अन्वये जानेवारी 2021-मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीकरिता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2022 (सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून त्यामध्ये अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत आरेंदा व खांदला समाविष्ठ आहेत निवडणूकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राबविण्यात येत आहे.

निवडणूकीचे टप्पे दिनांक:- तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 13 सप्टेंबर 2022 (मंगळवार) नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय,अहेरी ) दि. 21 सप्टेंबर2022 (बुधवार) ते दि.27 सप्टेंबर 2022 ( मंगळवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 (दिनांक 24 सप्टेंबर 2022 चा शनिवार व दिनांक 25 सप्टेंबर 2022 चा रविवार वगळून),नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय,अहेरी) दि.28 सप्टेंबर 2022 (बुधवार) वेळ स.11.00 वा. छाननी संपेपर्यंत,नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय,अहेरी) दि. 30 सप्टेंबर 2022 (शुक्रवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि.30 सप्टेंबर 2022 (शुक्रवार )दुपारी 3.00 वाजतानंतर, मतदानाचा दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 (गुरुवार) (स.7.30 वा.पासून ते दुपारी.3.00 वा.पर्यंत), मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक 14 ऑक्टोंबर 2022 (शुक्रवार) (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार निश्चित करण्यात येईल ). तरी वरीलप्रमाणे निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे,असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी,तथा तहसिलदार,अहेरी ओंकार शेखर ओतारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here