गडचिरोलीतील तिन विधानसभा क्षेत्रात 36 ऊमेदवारांनी 46 नामनिर्देशन अर्ज केले दाखल

54

जिल्ह्यात आज 36 उमेदवारांकडून 46 नामनिर्देशन अर्ज दाखल

Gadchiroli Teel 3 Assembly Constituency 36 Umedwarani 46 nomination applications filed

गडचिरोली, (s bharat news network) दि.29: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी एकूण 36 उमेदवारांनी 46 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्र दाखल केले यात आनंदराव गंगाराम गेडाम (अपक्ष), वामन वंगणुजी सावासाकडे (अपक्ष), शिलु प्रविण गंटावार (अपक्ष), माधुरी मुरारी मडावी (अपक्ष) दोन अर्ज, खेमराज वातूजी नेवारे (अपक्ष), गजबे कृष्णा दामाजी (भारतीय जनता पार्टी) दोन अर्ज, मोहनदास गणपत पूरम(वंचित बहुजन आघाडी) दोन अर्ज, निलेश देवाजी हलामी (अपक्ष), चेतन नेवशा काटेंगे (आझाद समाज पार्टी-काशीराम), अनिल तुलाराम केरामी (बहुजन समाज पार्टी), दामोधर तुकाराम पेंदाम(बहुजन समाज पार्टी), रामदास मळू मसराम (इंडियन नॅशनल काँग्रेस), निलेश छगनलाल कोडापे (अपक्ष) यांचा समोवश आहे.

68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात आज 10 उमेदवारांनी 13 नामनिर्देशनपत्र दाखल केले यात डॉ. देवराव मादगुजी होळी (अपक्ष)-दोन अर्ज, आसाराम गोसाई रायसिडाम(अपक्ष), विश्वजीत मारोतराव कोवासे(इंडियन नॅशनल काँगेस) दोन अर्ज, योगेश बाजीराव कुमरे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), डॉ. सोनल चेतन कोवे (अपक्ष) दोन अर्ज, मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस), मोरेश्वर रामचंद्र किनाके(अपक्ष), सौ वर्षा अशोक आत्राम (अपक्ष), दिवाकर गुलाब पेंदाम(अपक्ष), संजय सुभाष कुमरे (बहुजन समाज पार्टी),

69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी एकूण 17 नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात नितीन कविश्वर पदा (अपक्ष), भाग्यश्री मनोहर लेखामी (अपक्ष), आत्राम धरमराव भगवंतराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी) यांचे तीन अर्ज, निता पेंटाजी तलांडी (अपक्ष), आत्राम तनुश्री धर्मरावबाबा(नॅशनालिस्ट काँगेस पार्टी) यांचे तीन अर्ज, संदीप मारोती कोरेत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रमेश वेल्ला गावडे (बहुजन समाज पक्ष), अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), हनमंतु गंगाराम मडावी (अपक्ष), पोरतेट ऋषी बोंदय्या(नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गट), कुमरम महेश जयराम (अपक्ष), गेडाम शैलेश बिच्चू(अपक्ष) यांचा समावेश आहे.

आज 29 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 1 व्यक्तींकडून 2 नामनिर्देशन अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत 31 व्यक्तींकडून 92 अर्जांची उचल झाली. गडचिरोली विधानसभा मतदार संघातून आज 3 व्यक्तींकडून 4 अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत 31 व्यक्तींकडून 77 अर्जांची उचल झाली. अहेरी मतदारसंघातून आज 6 व्यक्तींकडून 7 अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत एकूण 48 व्यक्तींकडून 61 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here