खरीप पिकाची हंगामी पैसेवारी 73 पैसे
गडचिरोली, (s bharat news network Gadchiroli) दि.07: गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम 2024-2025 या वर्षाची हंगामी पैसेवारी ही 73 पैसे जाहिर करण्यात आली आहे.
खरीप पिकाची हंगामी पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन जाहीर करण्यात येते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरीप पिकाची गावे 1557 आहेत व एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 04 आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे 61 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही तर 50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1500 आहेत. अशा प्रकारे एकूण 1500 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.