शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न
नागपुर प्रतिनिधी 28/09/2024 रोज शनिवारला मा. संपर्क प्रमुख महेश केदारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे मा. आमदार भास्कर जाधव साहेब पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवन नागपूर येथे जिल्हा व्हाईस येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुक कांग्रेसचे उमेदवार बऱ्याच अंतराने जिंकलं त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व आरमोरी ह्या दोन विधानसभा क्षेत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घ्यावी अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी वरिष्ठांनकडे रेटुन लावली आहे.
दुसऱ्या दिवसी दिनांक 30/09/2024 रवीवारला हॉटेल रेडिशन ब्ल्यू येथे शिवसेना पक्षप्रमु मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांनी आढावा घेतला असता आपल्या पक्षप्रमुखांकडे गडचिरोली येथील भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीचा अवलोकन करून दोन विधानसभा आपल्या वाट्याला घ्यावी अशी मागणी करण्यात आली. गडचिरोली विधानसभा क्षेत्राची या क्षेत्राचे जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शिवसैनिक दुसऱ्या साठी काम केले पण आपल्या उमेदवारासाठी नाही त्यामुळे या क्षेत्रामध्ये शिवसेनेचा बोधचिन्ह तळागाळा पर्यंत पोहचला नाही आणि या क्षेत्रामध्ये विधानसभेला 1990 पासून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे गडचिरोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बोधचिन्ह पोहचला नाही. या पुर्वी भाजपचा प्राचार आणि आता कांग्रेसचा प्रचार करावा लागतो मग शिवसेने काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.म्हणून आपल्या नेत्यांना कळकळीची विनंती करुन सर्व पदाधिकाऱ्यांसह विशेष मागणी केली आहे. आणि या मागणीला माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सकारात्मक होकार दिला आहे. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी माजी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार विधानसभा संघटक नंदूभाऊ कुमरे उपजिल्हा प्रमुख नंदकिशोर चंदेल समन्वयक राजेंद्र लांजेकर ता. प्रमुख घनश्याम कोलते ता. प्रमुख किरण शेडमाके ता.प्रमुख मणोज पोरटे ता. प्रमुख संतोष लोनबले ता. प्रमुख गजानन नैताम शहर प्रमुख चामोर्शी बंडु नैताम गुरूदेव सोमनकर सोमाजी गुरनुले युवा सेना जिल्हा प्रमुख पवन गेडाम चेतन उरकुडे वैभव सातपुते किशन चंदेल सोहेल शेख शैबाझ शेख गणेश घोटे भुषण पोरटे पवन शेडमाके इ. शिवसैनिक उपस्थित होते.