गडचिरोलीच्या जंगलातील रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना नुकसानीची भरपाई देण्याची केली मागणी
२०-२५ हत्तींचा मोठा झुंड सेमाना वाकडी रस्त्यावर अचानक आल्याने लोकांमध्ये दहशत
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली चर्चा
वनमंत्रांशी यासंदर्भात पुन्हा चर्चा करणार
दिनांक २९ सप्टेंबर गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी प्रचंड धुडगूस घातला असून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे जीवितहानीची ही शक्यता बळावलेली आहे करिता भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वनविभागाकडे केली आहे.या रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे झालेले शेतीचे नुकसान त्यांचें पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची वनविभागाने व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या रानटी हत्ती मुळे सर्वसामान्य लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात लोकांचे जीव जाण्याची शक्यताही बळावलेली आहे. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाने या संदर्भात तातडीने पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. करिता वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.या संदर्भात आपण वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून वनमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेणार असल्याचे म्हणाले.