७ ऑक्टोबरला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून ५०० लोक अयोध्या तीर्थ दर्शनाला जाणार
आमदार डॉक्टर देवराव होळी
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत वळसा येथून ७ ऑक्टोबरला रेल्वेचे आयोजन
https://youtu.be/Xkdg1NCBKbQ?si=kTWQTg40Zsh6bLyv
आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या प्रयत्नांना यश
गडचिरोली शहर प्रतिनिधी
दिनांक 29 सप्टेंबर 2024 गडचिरोली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ७ आक्टोंबरला अयोध्या – तीर्थ दर्शनासाठी वडसा येथून रेल्वेने जाण्याचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ५०० लोकांचा समावेश आहे. या रेल्वेला राज्यातील मंत्र्यांसह आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात येणार आहे. ज्यांची नावे तीर्थदर्शनाकरिता मंजूर करण्यात आली आहेत त्यांनी त्या संबंधित असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र तातडीने समाज कल्याण अधिकारी गडचिरोली यांचेकडे सादर करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.निवडणुकीपूर्वी आपल्या विधानसभा क्षेत्रातील लोकांना या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत तीर्थदर्शनाचा लाभ घेता यावा याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यामध्ये समाज कल्याण अधिकारी डॉक्टर सचिन मडावी यांचीही मोलाची भूमिका असून त्यांनी यात मोठे सहकार्य केले. त्यामुळे तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील या करिता १ हजार भाविकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील पाचशे लोकांचा समावेश आहे. यासाठी भक्त भाविकांनी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे आभार मानले असून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी लवकरात लवकर रेल्वे उपलब्ध करून दिल्याने रेल्वे प्रशासनाचे व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा सांस्कृतिक विकास मंत्री यांचे आभार मानले आहे.