गडचिरोली जिल्ह्याची स्थानिक भरती प्रक्रीया सुरु करा जिलाधिकारी यांना तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निवेदनातुन केली मागणी
गडचिरोली :- तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात अतीदुर्गम व नक्षलग्रस्त या अनुषंगाने येणाऱ्या गडचिरोली जिल्हातील सर्व प्रशासकीय विभागातील (क व ड ) संवर्गातील पदे पोलिस भरती प्रमाणे स्थानिक उमेदवाराकडुन भरण्यात यावे,व यांचे शासन निर्णय काढण्यात यावे याकरीता तनुश्री धर्मरावबाबा आत्राम सिनेट सदस्या यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले असुन शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्य पने लक्ष द्यावे असे मत तनुश्री आत्राम यांनी पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले असल्याची माहीती आहे. निवेदन देतेवेळी युवा बेरोजगार उपस्थित होते.