महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारचे अनेक क्रांतिकारक निर्णय आमदार डॉक्टर देवराव होळी

34

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारचे अनेक क्रांतिकारक निर्णय आमदार डॉक्टर देवराव होळी

कुनघाडा येथे लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा

आवाहनाला प्रतिसाद देऊन मेळाव्याला आलेल्या लाडक्या बहिणींचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले आभार

Dated 25 September Kunghada correspondent (Ta Chamorshi Gadchiroli

दिनांक २५ सप्टेंबर कुनघाडा वार्ताहर (ता चामोर्शी गडचिरोली)  जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत, लाडक्या बहिणींना १५०० रुपये प्रतिमाह मानधन, मुलींना मोफत शिक्षण असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुनघाडा येथील लाडक्या बहिणींच्या भव्य मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर भाजपा प्रदेशाचे ओबीसी नेते मा. बाबुरावजी कोहळे. जयश्री धोडरे अध्यक्ष प्रभाग संघ कमलताई दुधबले सचिव प्रभाग संघ अर्चनाताई वाघाडे बँकसखी शकुंतलाताई तुंकलवार दर्शना नैताम प्रभाग संघ वंदना ठाकूर प्रभारसंघ भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे प्रामुख्याने उपस्थित होते.या मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्यावर असणारे स्नेह व्यक्त केले . मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आमदार महोदयांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here