धानोरा पोलीसांनी लावला 24 तासाच्या आत दोन बेपत्ता बहिणींचा शोध

127

धानोरा पोलीसांनी लावला 24 तासाच्या आत दोन बेपत्ता बहिणींचा शोध

Dhanora Police searched for two missing sisters within 24 hours

Taluka Representative Dhanora (Gadchiroli

तालुका प्रतिनिधी धानोरा (गडचिरोली)   24/09/2024 रोजी मौजा काकडयेली येथील रहिवासी नामे सिताराम कारु बोगा वय 62 वर्षे रा. काकडयेली ता. धानोरा जि. गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन, धानोरा येथे येऊन रिपोर्ट दिली की, त्यांंची मोठी मुलगी नामे सौ. छाया प्रमोद हलामी, वय 33 वर्षे, रा. वानरचुवा ता. आरमोरी जि. गडचिरोली ही वानरचुवा येथुन माहेरी त्यांना भेटण्यासाठी दिनांक 07/09/2024 रोजी काकडयेली येथे आली होती व ती तेव्हापासुन त्यांचेकडेच काकडयेली येथे वास्तव्यास होती. परंतु दिनांक 20/09/2024 रोजी अंदाजे दुपारी 03:30 वाजता दरम्यान त्यांची लहान मुलगी कु. शिला सिताराम बोगा, वय 20 वर्षे, रा. काकडयेली ता. धानोरा जि. गडचिरोली हिचे सोबत कोणालाही न संागता काळी पिवळी चारचाकी वाहनाने धानोराकडे जातांना दिसल्या, परंतु रात्रोपावेतो त्या दोघी बहिणी घरी परत आल्या नाहीत. याबाबत नातेवाईकांकडे, त्यांच्या मैत्रिणींकडे व इतर ठिकाणी विचारपुस केली असता, त्या दोघींचा शोध लागला नाही. त्यामुळे दिनांक 24/09/2024 रोजी सायंकाळी फिर्यादी नामे सिताराम कारु बोगा यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे धानोरा येथे मिसींग क्रमांक 18/2024 अन्वये मिसींग रिपोर्ट दाखल करण्यात आली.

 

त्यानंतर सौ. छाया प्रमोद हलामी व कु. शिला सिताराम बोगा ह्रा दोन्ही बहिणींचा शोध घेत असतांना पोस्टे धानोराचे प्रभारी अधिकारी पोनि. श्री. स्वप्नील धुळे यांना त्यांचे गोपनिय सुत्रांकडुन नमुद दोन्ही मुली ह्रा औंधी (छत्तीसगड) येथे असुन सौ. छाया प्रमोद हलामी ही रागाच्या भरात घरातुन निघुन जाऊन जीवाचे बरे वाईट करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली औंधी (छत्तीसगड) येथील पोलीसांशी संपर्क साधुन ताबडतोब आंैधी (छत्तीसगड) येथे जाऊन सतर्कतेने 24 तासाचे आत दोन्ही बेपत्ता मुलींचा शोध घेऊन पोस्टेला आणुन सुखरुप त्यांच्या वडीलांच्या ताब्यात देण्यात आल्या.

 

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी कॅम्प कारवाफा अतिरीक्त कार्यभार उपविभाग धानोरा श्री. जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे धानोरा पोनि. श्री. स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात मपोउपनि. चैत्राली भिसे, पोहवा/भजनराव गावडे, मपोअं/प्रियंका कावळे, वैष्णवी पालकुर्तीवार यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here