नेताजी नगर येथे १.२८ कोटी रुपयांच्या कामांचे आ डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण
लेखाशीर्ष 2515 व रोजगार हमी योजना अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे
दिनांक १९ सप्टेंबर नेताजी नगर
चामोर्शी तालुक्यातील नेताजी नगर येथे लेखाशीर्ष २५१५ व रोजगार हमी योजना अंतर्गत १.२८ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले. विकास कामांना कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले.
याप्रसंगी बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, नेताजी नगरच्या माजी सरपंच तथा भाजप नेत्या अनिताताई रॉय, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, सपन दास, मलिन डे, सपन बाला, सुदंना ढाली, दिलीप मलंगी, चित्त शिकदार, सुशांत बैद्य भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.