मृत महिलेचे ताब्यात असलेले मालमत्तेचे गैरवापर करणा-या आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

367

मृत महिलेचे ताब्यात असलेले मालमत्तेचे गैरवापर करणा-या आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

The accused who misappropriated the property in possession of the deceased woman shall be sentenced to three years rigorous imprisonment and a fine of Rs.10,000/-

मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहेरी श्री. आर. एन, बावणकर यांचा न्यायनिर्णय

 

सविनय वृत्त असे आहे की, दिनांक २३/७/२०१५ रोजी महिला नामे सौ. ऐसिंथा अविनाश तागड उर्फ सुरेश पिल्ले उर्फ डॉली वय अंदाजे ३३ वर्ष ही महिला बेपत्ता असलेबाबत तिची बहीण सौ ज्युलिएटारिटा साईराज देशपांडे रा. सुभाषटेकडी, उल्हासनगर जि. ठाणे यांच्या तक्रारी वरुन पोस्टे करमाड जि. औरंगाबाद ग्रामिण येथे हरविल्या प्रकरण क. ००/२०१५ प्रमाणे नोंद करण्यात आले. त्यामध्ये सदर महिला बेपत्ता होण्यामागे तिचे पती अविनाश बाळासाहेब तागड, पोउपनि यास जबाबदार धरुन त्यांचे विरुध्द तकार केलेली होती. सदरची महिला ही अहेरी जिल्हा गडचिरोली येथे शेवटची दिसल्याने मिसिंग प्रकरण दिनांक ३०/७/२०१७ रोजी पोलीस स्टेशन अहेरी येथे मिसिंग क. १८/२०१७ प्रमाणे नोंद केले पोउपनि निलेश सोंळके, अहेरी यांनी तपास हाती घेवुन सदर बेपत्ता महिला ही अविनाश तागड यांच्या सोबत अपार्टमेंट सोसायटी मधील फ्लॅट क. एफ-६ पहिला माळा, पोलीस संकूल शेजारी अहेरी जिल्हा गडचिरोली येथे राहत होती. त्या फ्लॅट मधुन बेपत्ता महिलेची कपडे व इतर वस्तू असलेले अमेरिकन ट्युरीस्टर कपंनीची मोठी बॅग पंचनामा करुन हस्तगत केले.

 

फिर्यादीचे रिपोर्ट असे आहे की, मृत महिला नामे सौ. ऐसिंथा सुरेश पिल्ले उर्फ डॉली ही अहमदनगर येथे आर्मी स्कुलमध्ये शिक्षीकेची नोकरी करीत होती. पोउपनि अविनाश तागड यांचेसोबत आठ वर्षापासून प्रेम संबंध होते. दिनांक ८/७/२०१४ रोजी ऐसिंथा हिने आपले बहिनिस कळविले की अविनाश तागड यांचे सोबत गडचिरोली येथील एका मंदिरात लग्ण केले आहे. व दिनांक ८/८/२०१४ रोजी अहमदनगर येथील फिर्यादी ज्युलिएरिटा त्यांच वडीलांचा घरी आरोपी अविनाश तागड सोबत फिर्यादीचे बहीन ऐसिंथा यांचे बिदाई कार्यक्रम करण्यात आले होते. सप्टेबर २०१४ मध्ये ऐसिंथा ही अविनाश तागड बरोबर पुर्ण तिचे सामान घेवुन अहेरी जिल्हा गडचिरोली येथे गेली, नतंर वडीलांचे प्रकृती बिघडल्याने घरी एकटीच परत आली त्यानंतर जानेवारी अखेरीस ऐसिंथा व अविनाश हे अहेरी जिल्हा गडचिरोली येथे गेले, तिचे बहीनी सोबत दिनांक १९/२/२०१५ रोजी फोनवर शेवटचे बोलने झाले. त्यानंतर तिचे बहीनीचा फोन व मॅसेज येत नसल्याने तिचे पती अविनाश तागड यांचे

मोबाईलवर सपंर्क केले परंतु त्यांने फोन उचलत नव्हते म्हणुन मी तिचे शोध घेतले परंतु

 

मिळून न आल्याने अविनाश तागड यांचे पत्ता शोधुन अविनाश नेमणुकीस असलेले करमाड

 

पोस्टेला जावुन त्यांना बहीणीबाबत विचारपुस केले असता अविनाश यांनी उडवा उडविचे उत्तर दिले. म्हणुन त्यांचेवर शक निर्माण करुन त्यांचे विरुध्द तक्रार दिले.मिसींग प्रकरणाच्या तपासामध्ये तथ्य आढळुन आल्याने व आरोपी क. १. अविनाश बाळासाहेब तागड यांने त्याची पत्नी सौ, ऐसिंथा अविनाश तागड हिचा दिनांक २४/२/२०१५ रोजी खुन करुन तिचा मृतदेह त्यांचे साथीदार आरोपी क. २. सुनिल हनमंतु येमुलवार व आरोपी क. ३ विनोद भुमया जिलेवार दोन्ही रा. अहेरी यांचे मदतीने व्हिलेवाट लावुन पुरावा नष्ट केला व मयताच्या अंगावरील दागीने तसेच तिचे ईतर साहीत्य अंदाजे किमंत ६०,०००/- रुपयाचा अपहार केला, असे निष्पन्न झाल्याने किरण दिडवाघ, पोउपनि यांचे रिपोर्ट वरुन पोस्टे अहेरी अप.क. ५४/२०१५ कलम ३०२.२०१.४०४,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करुन सेशन कोर्टात दाखल केले.

 

मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, अहेरी याने सेशन केस क. १७/२०२३ मध्ये साक्ष पुरावा घेतले असता फिर्यादी व साक्षीदार यांचे पुरावा व सरकारी पक्षाचे युक्तीवाद मा. व्यायालयाने ग्राहय धरुन दिनांक १८/०९/२०२४ रोजी आरोपी नामे अविनाश बाळासाहेब तागड, वय ३२ वर्ष रा. पाथर्डी तह पाथर्डी जि. अहमदनगर यास कलम ४०४ भादवी मध्ये तीन वर्ष कारावास १०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

 

सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहीले तसेच गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. स्मेश धुमाळ यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षादारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहीले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here