चामोर्शी- हऱणरघाट मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन
चामोर्शी – हरणाघाट राष्ट्रीय महामार्ग ३७० हा रस्ता काँक्रीट रोड करणे अथवा राष्ट्रीय महामार्ग मध्ये दर्जोन्नत करुन दुरुस्ती करावी अशी मागणी राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात महटले की, दोन महिन्यापूर्वी या रस्त्याचे मजबू तीकरण करण्यात आले मात्र अल्पावधीच रस्त्याची दुरवस्था झाली आहे .
जिल्ह्यातील चामोर्शी हा तालुका मोठा असून राजकीय व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीमध्ये शासनाच्या औद्योगिक कॅरिडोर मध्ये विविध प्रकल्प या तालुक्यात आले आहेत. यामध्ये मुख्यत्वे कोनसरी लोह प्रकल्प असून शासनाने इस्पात प्रकल्पाची देखील घोषणा केलेली आहे. चामोर्शी तालुक्यातील प्रकल्पाकरिता भूसंपादन प्रक्रिया प्रगतीत असून हजारो हेक्टर जमिनीचा विकास होणार आहे. शासनाच्या या धोरणामुळे चामोर्शी तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा औद्योगिक व सामाजिक विकास होत आहे यात शंकाच नाही.
परंतु या सर्व गोष्टी करिता गडचिरोली मध्ये येणाऱ्या काळात अति जड वाहने आणि इतर वाहनांची संख्या नक्कीच वाढणार आहे. वाहतूक वर्दळीच्या मानाने गडचिरोली आणि त्यातच चामोर्शी तालुक्यातील रस्ते त्या दर्जाचे नाहीत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चामोर्शी तालुक्यात गेले अनेक वर्षे रस्त्यांची पुनर्बांधणी झालेली नसून निवळ दुरुस्ती होत आहे. याच चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता म्हणजे मुल -हरणघाट – चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३७० असून चंद्रपूर जिल्ह्याला जोडतो. गेली कित्येक वर्षे या रस्त्यावरती कामे झालेली नाहीत. सांगण्यात येते की सार्वजनिक बांधकाम विभाग वेळोवेळी शासनाला प्रस्ताव पाठवतो परंतु अर्थसंकल्पात कामे मंजूर होत नाहीत. या रस्त्याला बघताक्षणी कळते की रस्ता खाली आणि बाजूची शेत जमीन वर आह शेतीचे सोडलेले पाणी वर्षानुवर्षे रस्त्याच्या खालच्या थरात जाऊन रस्ता पूर्ण खचलेला आहे. या रस्त्याला कामे करूनही रस्ता या कारणाने खराब होणारच यात शंका नाही. यातच गेली २ ते ३वर्षे चामोर्शी तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालेला असून याच रस्त्याचा बराच भाग पाण्याखाली राहतो. त्यात भर म्हणजे सुरजागड खदान आणि कोनसरी प्रकल्पाचे ६० ते ७० टनाचे अति जड ट्रक या रस्त्याने मुल कडे जात आहेत. बांधकाम विभागाने ही वाहतूक पर्यायी मार्गाने चामोर्शी- गडचिरोली – मुल मार्गाने वळविण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. पण वाहतूक जास्त प्रमाणात चालू असून रस्ता जास्तच खराब होत आहे. बांधकाम विभागाने नवीन काम आणि खड्डे तात्पुरते पावसाळ्यामुळे बुझवले पण पाऊस आणि ह्या ट्रकांच्या वाहतुकीने परत रस्ता खराब होत आहे. हा रस्ता हरणघाट पुल ते चामोर्शी पर्यंत काँक्रीटने बांधल्यास तो टिकेल अन्यथा परत तीच दुर्राआ वस्था होणार. चामोर्शी तालुक्याच्या औद्योगिक विकासाकरिता हा रस्ता मुल-हरणघाट – चामोर्शी राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून काँक्रीटचा करण्यात यावा अथवा हरणघाट पुल ते चामोर्शी साधारण १४ ते १५ किलोमीटरचा रस्ता काँक्रीट बांधावा.अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.