परिवहन विभागात प्रशिक्षणार्थी मेळावा,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

33

परिवहन विभागात प्रशिक्षणार्थी मेळावा,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली,(s bharat news network)दि.02: कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभाग महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय, दिनांक 9 जुलै 2024 संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असुन या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. सदर विद्यावेतनाचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. शैक्षणिक अर्हता- 12 वी पास- प्रतिमाह विद्यावेतन रुपये 6 हजार, आय.टी.आय/पदविका- रुपये 8 हजार, पदविधर/पदव्युत्तर- रुपये 10 हजार असेल.

सदर योजनेअंतर्गत उमेदवारांना या योजनेकरीता कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच विभाग नियंत्रक ह्यांचे कार्यालय, धानोरा रोड, एस.टी. बसस्थानक, आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली येथे दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते 16.00 वा. पर्यंत रोजगार मेळावा (कॅम्प)चे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच ज्यांनी https:rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवरुन महामंडळाला अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी सुद्धा सदर तारखेला संपुर्ण शैक्षणिक मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. तरी इच्छुक उमेदवारांना सदर रोजगार मेळावा येथे ऑफ लाईन अर्ज ही सादर करता येतील. असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन, गडचिरोली यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here